PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 22, 2024   

PostImage

झेलम परांजपे यांनी त्यांची शाळा राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी सुरू …


सध्या संपूर्ण भारतात राम मंदिराच्या उद्घाटनाचं वातावरण आहे. त्यानिमित्ताने देशातल्या सहा राज्यांनी सुटीही जाहीर केली आहे. महाराष्ट्रातही राज्य शासनाने सुटी जाहीर केली आहे.

 

दिल्लीतील एम्स रुग्णालयाने सुद्धा ओपीडी दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

 

मात्र ओड़िसी नृत्यांगना आणि साने गुरुजी विद्या मंदिर शाळेच्या संचालिका यांनी मात्र त्यांची शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या शाळेच्या मुलींचा फोटो फेसबुकवर त्यांनी हा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला.

 

त्या म्हणतात, “आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं.....सरकारी GR शेवटच्या क्षणी येतो, आम्हाला राम प्राण प्रतिष्ठेची सुट्टी नको. राम लल्ला सुध्दा खूश नाही होणार आमचा अभ्यास बुडला तर.... आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार...”

त्यांच्या या निर्णयावर फेसबुकवर जोरदार टीका झाली. त्याबद्दलही त्यांनी भूमिका पुन्हा एक फेसबुक पोस्ट लिहून जाहीर केली आहे.

 

त्या म्हणतात, “माझ्या दोन दिवसा पूर्वीच्या पोस्ट मुळे थोडा गैरसमज झाला आहे तो मी दूर करू इच्छिते. शाळा चालू राहणार हा निर्णय आमचा आहे, मुलींचा स्वतःचा नाही.”

 

काही प्रसारमाध्यमांमध्ये मुलींनी स्वत:हून शाळेत न जाण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या.

 

त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.

तसंच त्यांनी ट्रोल्सना देखील उत्तर दिलं आहे.

 

त्या म्हणतात, “ज्या लोकांनी troll केले आहे, त्यांची गैरसमजूत दूर करण्यास त्यांना सांगू इच्छिते...,माझं रामाशी काहीही वावगं, वाकडं नाही ..राम मंदिर होतंय, supreme court निर्णय आहे, या घटनेशी देखील माझं काही वावगं नाही.

 

गीत रामायण सारखे आणि तुलसी रामायण सारखे अतिउत्तम काव्यावर आम्ही नृत्य सादर केले आहे. लोकांना ते भावले आहे.

 

तसेच, आम्ही वसंत बापट यांच्या "देह मंदिर चित्त मंदिर" आणि साने गुरुजींच्या "खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे" या गीतांवर देखील नृत्य सादर केली आहेत. आणि ते ही लोकांना भावले आहे.

 

हा निर्णय म्हणजे कुठल्या एका पक्षाने कुठल्या दुसऱ्या पक्षाला विरोध नाही केलेला.

 

सांगण्याचा मुद्दा असा की जे पटत नाही त्याचा विरोध करावा.

 

शेवटच्या क्षणी सुट्टी जाहीर करणे पटले नाही, विरोध केला, troll झाले.

 

१९७५ साली आणीबाणी जाहीर झाली, पटलं नाही, विरोध केला, तुरुंगात गेले.

 

बास्स एवढेच....”

या प्रकरणी बीबीसी मराठीनेही त्यांच्याशी संवाद साधला.

 

त्या म्हणाल्या, “ हा जीआर अगदी वेळेवर आला. आमच्या शाळेतील दहावीच्या मुलांची परीक्षा सुरू आहे. अशा परिस्थितीत सुटी देणं योग्य नाही असं आमचं मत झालं. हा निर्णय सर्वसहमतीने घेण्यात आला आहे. याच दिवशी नाही तर इतरही सार्वजनिक सुटीच्या दिवशी आम्ही शाळेत येतो. उदा. गांधी जयंती. त्या दिवशी मुद्दाम शाळेत येतो. जेणेकरून मुलांना गांधीजींबद्दल नीट माहिती मिळेले.

 

त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी वेगळा नाही. मी कोणत्याही देवाच्या विरोधात नाही हे मी पुन्हा सांगते असं त्या म्हणाल्या. हा संपूर्णपणे प्रशासकीय कारणासाठी घेतलेला निर्णय आहे," असं त्या पुढे म्हणाल्या.

 

झेलम परांजपे कोण आहेत?

झेलम परांजपे या प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना आहेत. माजी मंत्री सदानंद वर्दे आणि राष्ट्र सेवा दलाच्या नेत्या सुधा वर्दे हे त्यांचे आई-वडील होत.

 

वसंत बापट आणि रमेश पुरव यांच्या मार्गदर्शनात झेलम परांजपेंनी राष्ट्र सेवा दलातील नृत्यनाटिकांमध्ये काम केलं होतं. पुढे गुरू शंकर बहेरा यांच्याकडून त्यांनी ओडीशी नृत्याचे धडे गिरवले.

 

अनेक मानद महोत्सवांमध्ये त्यांनी ओडिसी नृत्याचं सादरीकरण केलं आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी परीक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे. नृत्य क्षेत्रातल्या त्यांच्या सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय.

राज्यात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याखाली सुटी देण्यात आली आहे. या कायद्याच्या कलम 26 नुसार विशेष प्रसंगांना राज्य सरकारला सुटी देण्याचा अधिकार आहे.

-०-


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 20, 2024   

PostImage

*22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा …


 अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होत असून प्रभू राम मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी राज्य सरकारकडून 22 तारखेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून श्रीराम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वांना पाहता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

 

 या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर काही राज्यांमध्ये पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

 

 त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील तसाच निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून देखील 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राम मंदिल लोकार्पणाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

 *२२ जानेवारीला राज्यातील सर्व आस्थापना, शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत.* 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 18, 2024   

PostImage

Ramayan: एका रामायणात सीता रामाला शिव्या देते', भालचंद्र नेमाडे यांचं …


'

प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे. त्यामुळे रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पण अशा वातावरणात आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रामायण आणि प्रभू रामांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

“अनेक रामायणांमध्ये राम वेगळा आहे. एका रामायणात तर चक्क राम आणि सीता हे बहिणी-बहिणी आहेत. वाल्मिकीचा राम कशामुळे खरा म्हणायचा? वाल्मिकी हा श्रृंग घराण्याचा दरबारी कवी होता. शृंगांना जसं आवडलं तसं रामायण वाल्मिकी यांनी लिहिलं. तसेच राम हा शाकाहारी होता का मांसाहारी होता यावर चर्चा कशाला हवी? ते खोलात जावून शोधलं पाहिजे. एका रामायणात तर सीता ही रामाला अक्कल नाही, अशा शिव्या देते”, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले आहेत. जळगावातील भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या साहित्य पुरस्कारांचे वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

“खोट्याला किंमत नाही. लेखकाने जे सत्य आहे ते नीट तपासून पाहावं. त्याचेही दोन प्रकार असतात. दिसणारं सत्य आणि न दिसणारं सत्य. लेखकाला न दिसणारं सत्य सापडलं पाहिजे. हे खोटं बोलत आहेत, राम मांसाहारी होता की शाकाहारी होता? आता हे वाचूनच लक्षात येतं ना, कशाकरता त्याची चर्चा करायची? त्यामुळे जे खरं आहे ते प्रत्यक्ष खोदून पाहा, मग कळेल खरं काय आहे ते. नुसतंच टीव्ही, भाषणं, चर्चा वगैरे भानगडीतून सत्य सापडणार नाही. प्रत्यक्ष जावून शोधणं महत्तावचं आहे की, हे खरोखरंच आहे का? त्यात पुन्हा एकच रामायण आहे का? आमचे मित्र रामानुंज यांनी टू हन्डरेड रामायण हे पुस्तक लिहिलं आहे. ते बंद पाडलं. कशामुळे?”, असा सवाल भालचंद्र नेमाडे यांनी केला.

 

‘काही ठिकाणी राम आणि सीता हे बहिणी-बहिणी’

 

“चंगनिश खान होता, त्याला रामायण अत्यंत आवडतं होतं. ते मी ब्रिटियश म्युझियममध्ये एकदा पाहिलं, तर त्यातला राम वेगळाच आहे. नंतर इकडे कंबोर्डियातला राम वेगळाच आहे. जैन रामायणातला राम वेगळा आहे. काही ठिकाणी राम आणि सीता हे बहिणी-बहिणी आहेत. सीता ही रावणाची मुलगी आहे”, असा दावा भालचंद्र नेमाडे यांनी केला.

 

‘वाल्मिकी श्रृंग घराण्याचा दरबारी कवी, श्रृंगांनी बौद्ध धर्माचा नाश केला’

 

“राम म्हणजे 60 हजार वर्षांपूर्वीचा धनुष्यबाण युद्धस्थानाचा तो नायक. त्याचं अनेक युगांपासून बदलत बदलत वाल्मिकीच्या काळात आता आपल्याला माहिती आहे की नाही, वाल्मिकी श्रृंग घराण्याचा दरबारी कवी होता. श्रृंगांना आवडेल तसं त्याने रामायण लिहिलं. श्रृंगांनी बौद्ध धर्माचा नाश केला. बौद्ध आणि जैन धर्म आपल्या देशातील सर्वात जुने, सर्वात सामाजिक, अहिंसक असे धर्म, त्यांचा नाश करणारे हे श्रृंग आणि आपल्याकडचे शालिवान. त्यांनी नाश केला आणि ब्राह्मण धर्म प्रस्थापित केला”, असं नेमाडे म्हणाले.

 

‘आसामच्या रामायणात सीता रामाला शिव्या देते’

 

“आता अशी परिस्थिती होते की, खरा कोणता राम म्हणायचा, वाल्मिकी राम खरा म्हणायचा? वाल्मिकीच्या आधी मी आसाममध्ये एका समूदायाचं रामायण पाहिलं. त्या समूदायाचे आता 15 हजार लोकं राहिले आहेत. त्यांच्यातला राम वेगळा. त्यांच्यात सीता मुख्य, ती रामाला आज्ञा देत असते, रामाला शिव्या देत असते. तुला अक्कल नाही वगैरे असं. ते मराठीत आलं पाहिजे किंवा सगळ्याच भाषेमध्ये”, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

 

“थोडक्यात म्हणजे जैन धर्मीय लोकांचं रामायण का खरं नाही? आणि कंबनाचं रामायण का नाही खरं? सगळेच रामायण माहिती पाहिजेत. नुसतंच एक रामायण नाहीय. आणि तुवंडे रामायण लोकांना का वाचू देत नाही?”, असा प्रश्न भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित केला.